( 29 Jun, 2015) मुलभुत अधिकार Published By : upscgk.com मुलभुत अधिकार :- समानतेचा अधिकार :- कायद्यापुढे समानता धर्म , वंश , जात , लिंग , जन्मस्थान या अथवा यापैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव करण्यास मनाई स्त्रिया व बालके यांच्याकरिता कोणतीही विशेष तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंद होणार नाही . सार्वजनिक सेवा योजनांच्या बाबींमध्ये समान संधी . अस्पृश्यता नष्ट करणे स्वातंत्र्याचा अधिकार :- भाषण व अभिव्यक्ती यांच्या स्वातंत्र्याचा शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याचा अधिसंघ वा संघ बनविण्याचा . भारताच्या राज्याक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा . भारताच्या राज्याक्षेत्राच्या कोणत्याही भागात राहण्याचा व स्थायिक होण्याचा . कोणताही पेशा आचरण्याचा अथवा कोणताही व्यवसाय ,उदीम किंवा धंदा चालविण्याचा . अपराधांबद्दलच्या दोष सिद्धी बाबत संरक्षण जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे रक्षण . विविक्षित प्रकरणी अटक व स्थानबद्धता यांपासून संरक्षण शोषणाविरुद्धचा अधिकार :- माणसांना अपव्यवहार आणि वेठ यांना मनाई . कारखाने इ. मध्ये वा धोक्याच्या कामावर चौदा वर्षे वयाखालील बालकांना कामावर ठेवण्यास मनाई . धर्मस्वातंत्र्याचा अधिकार :- सद्सदविवेकबुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रतिज्ञापन आचरण व प्रसार धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य . एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरिता कर देण्याबाबत स्वातंत्र्य . विविक्षित शैक्षणिक संस्थात धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य . सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार :- अल्पसंख्यांक समाजाच्या हितसंबंधांचे संरक्षण अल्पसंख्यांक समाजांच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा अधिकार